बातम्या

अंबाबाई मंदिर परिसरातील सरस्वती टॉकीज शेजारी बहुमजली वाहनतळ सुर

Talkies in the Ambabai Temple area


By nisha patil - 9/23/2025 12:09:32 PM
Share This News:



कोल्हापूर (ता.२२) – अंबाबाई मंदिर शेजारील सरस्वती टॉकीजजवळील कोल्हापूर महानगरपालिकाच्यावतीने नव्याने विकसित करण्यात आलेल्या बहुमजली पार्किंगला आजपासून सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी एकूण ७५ फोर व्हीलर व २५० टू व्हीलर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील एकूण रु.७९.९६ कोटींपैकी रु.५०.७० कोटींचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झाला आहे. त्यातून ए वॉर्ड, सि.स.नं.२२६७(अ) येथील पार्किंग प्रकल्पाला सुरुवात झाली. या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारणीसाठी मेसर्स व्ही.के. पाटील इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांना निविदा मंजूर झाली होती.
या इमारतीत तळघर, तळमजला, पहिला व दुसरा मजला या टप्प्यात सुमारे 75 चारचाकी व 250 दुचाकी पार्किंग, तसेच 94 केबिन धारकांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. आजअखेर या प्रकल्पावर रु.20 कोटी खर्च झालेला आहे उर्वरित काम सुरू असून त्यामध्ये भक्त निवास बांधण्यात येणार आहे.

प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार पार्किंग फी वसुलीसाठी १० कर्मचारी व एक सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर. उप आयुक्त प्रतितोष कंकाळ व सहा. आयुक्तस्वाती दुधाणे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, लिपिक गिरीष नलवडे, सहा. अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, मुकादम रवि कांबळे यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली. आज पहिल्या दिवशी सायंकाळी 6 पर्यंत १८० वाहनांचे पार्किंग करण्यात आले आहे.
 


अंबाबाई मंदिर परिसरातील सरस्वती टॉकीज शेजारी बहुमजली वाहनतळ सुर
Total Views: 87