शैक्षणिक

तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कुल गवसेचे दैदिप्यमान यश

Taluka Level Science Quiz Competition


By nisha patil - 12/16/2025 10:56:49 AM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार ):- पंचायत समिती शिक्षण विभाग, आजरा व आदर्श हायस्कूल शिरसंगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025- 26 अंतर्गत  झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत  बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे शाळेने प्रथम क्रमांक पटकाऊन यश संपादन केले.
     या स्पर्धेमध्ये तालुक्यातील शाळांचा समावेश होता. गवसे हायस्कुलच्या  कुमारी रिया संजय पाटील,कुमारी स्नेहल नामदेव पाटील,कुमारी श्रेया रमेश पाटील या विद्यार्थिनीनी भाग घेतला होता.माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कुल गवसेने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
     विजेत्या विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक  भालेकर आर.बी.यांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व जनता एज्युकेशन सोसायटी आजरा यांचे तर्फे  कौतुक करण्यात आले तसेच पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.


तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कुल गवसेचे दैदिप्यमान यश
Total Views: 126