बातम्या
सुलगाव ता. आजरा येथे शेतकरी गटांची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 9/24/2026 8:56:30 PM
Share This News:
सुलगाव ता. आजरा येथे शेतकरी गटांची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
*आजरा (हसन तकीलदार):- महाराष्ट्र शासन कृषी विभाग,पाणी फाउंडेशन,उमेद व आत्मा अंतर्गत पाणी फाउंडेशन अंतर्गत कार्यरत गटांचे निमंत्रक यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आज गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी महादेव मंदिर सुलगाव,तालुका आजरा येथे आयोजित करण्यात आली होती .या कार्यक्रमात पाणी फाउंडेशनचे अधिकारी अभिजीत सुतार आणि संजना मदने यांनी पाणी फाउंडेशन अंतर्गत गटांच्या कार्याचा आढावा घेतला. गटाचे निमंत्रक यांनी गटामार्फत भविष्यात करण्यात येणाऱ्या कामाबद्दल माहिती दिली व आपली मनोगते व्यक्त केली.
सौ.मनिषा पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी तथा मेंटर पाणी फाउंडेशन )यांनी पाणी फाउंडेशन स्पर्धेच्या अनुषंगाने गटांनी केलेल्या कामाबद्दल व भविष्यात करावयाच्या कामाबद्दल मार्गदर्शन केले तसेच गटांमध्ये कार्यरत महिला शेतकरी यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्याबाबत सविस्तर माहिती दिली.अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा) यांनी शेतकरी गटांनी एकत्र येऊन शेतमालावर प्रक्रिया करून स्वतःची विपणन व्यवस्था तयार करण्याबाबत आवाहन केले प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त गटांनी शेतमाल प्रक्रिया उद्योग चालू करून आर्थिक उन्नती साधावी असे सांगितले.तसेच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 बाबत माहिती दिली.कार्यक्रमाची सुरुवात भावेश्वरी शेतकरी गट सुलगाव यांनी सर्व अधिकारी व निमंत्रक यांचे औक्षण करून व गटाने तयार केलेल्या पुष्पगुच्छ आणि स्वागत गीताने करण्यात आले.या कार्यक्रमाचे नियोजन भावेश्वरी शेतकरी गट सुलगाव यांनी केले. आभार सौ.मनिषा पाटील यांनी मानले.यावेळी गटाचे निमंत्रक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुलगाव ता. आजरा येथे शेतकरी गटांची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
|