बातम्या
आजरा महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन
By nisha patil - 9/22/2026 7:56:43 PM
Share This News:
आजरा महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन
३ ऑक्टोबर रोजी रंगणार स्पर्धा; २५ सप्टेंबरपर्यंत मोफत नाव नोंदणी
*आजरा (हसन तकीलदार)- : जनता शिक्षण संस्था, आजरा संचलित आजरा महाविद्यालय (कनिष्ठ विभाग) यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. काशिनाथ आण्णा चराटी व संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी कै. माधवरावजी देशपांडे यांच्या स्मृती पंधरवड्यानिमित्त आजरा तालुक्यातील माध्यमिक शाळांसाठी तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आजरा महाविद्यालय परिसरात होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील वक्तृत्वकौशल्य, वैचारिक मांडणी तसेच लेखनकौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना प्रभावीपणे व्यक्त करण्याची तसेच विविध विषयांकडे चिकित्सक व सर्जनशील दृष्टीने पाहण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत आजरा तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नसून नाव नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. सहभागी शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची नावे २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदविणे आवश्यक आहे.
नाव नोंदणीसाठी प्रा. सौ. व्ही. एम. देसाई – ७८७५८७१२८९, प्रा. सौ. एस. एस. कुलकर्णी – ९४२११००३७४, प्रा. श्री. व्ही. डी. हाक्के – ९७६५६११७९७, प्रा. श्री. बी. व्ही. गावडे – ९१५८५८९१४६ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करणेत आले आहे.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आजरा महाविद्यालयात तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन
|