बातम्या
पेरियार विद्यापीठ, सेलम, तामिळनाडू ची विद्यार्थिनी, कु. सौम्या हिचे समर रिसर्च प्रोजेक्ट भौतिकशास्त्र विभाग, विवेकानंद कॉलेज येथे पूर्ण
By nisha patil - 7/26/2025 3:24:40 PM
Share This News:
पेरियार विद्यापीठ, सेलम, तामिळनाडू ची विद्यार्थिनी, कु. सौम्या हिचे समर रिसर्च प्रोजेक्ट भौतिकशास्त्र विभाग, विवेकानंद कॉलेज येथे पूर्ण
कोल्हापूर दि. 24: पेरियार विद्यापीठ, सेलम, तामिळनाडू येथील विद्यार्थिनी, कु. सौम्या हिची समर रिसर्च प्रोजेक्ट साठी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर मधील भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय लठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, न्यू दिल्ली कडून तिची निवड करण्यात आली. जून ते जुलै 2025 या दोन महिन्याच्या कालावधीत त्यांना नेमून दिलेले संशोधन कार्य त्यांनी भौतिकशास्त्र विभागामध्ये पूर्ण केले.
कु. सौम्या यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्रा. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अंतर्गत मूल्यमापन हमी कक्षच्या डॉ. श्रुती जोशी, प्रबंधक श्री. सचिन धनवडे, श्री. किरण साळुंखे, तसेच यांचे सहकार्य लाभले.
पेरियार विद्यापीठ, सेलम, तामिळनाडू ची विद्यार्थिनी, कु. सौम्या हिचे समर रिसर्च प्रोजेक्ट भौतिकशास्त्र विभाग, विवेकानंद कॉलेज येथे पूर्ण
|