राजकीय
कोल्हापूर जि.प. निवडणूक : घुणकीत काँग्रेस विजयी, इतर ठिकाणी आघाडीचे चित्र स्पष्ट
By Administrator - 9/2/2026 11:39:27 AM
Share This News:
कोल्हापूर जि.प. निवडणूक : घुणकीत काँग्रेस विजयी, इतर ठिकाणी आघाडीचे चित्र स्पष्ट
जि.प.–पं.स. मतमोजणी सुरू; घुणकीत काँग्रेसची बाजी
कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणी शांततेत; काँग्रेसला पहिला विजय
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून शांततेत सुरुवात झाली असून जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर झाला आहे. घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार यांनी विजय मिळवला आहे.
पंचायत समिती नवे पारगाव मतदारसंघातून काँग्रेसचे भारत पाटील विजयी झाले असून गुडघे पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांनीही विजय संपादन केला आहे.
दरम्यान शिरोळ तालुक्यात मतमोजणी सुरळीत सुरू असून आलासमध्ये काँग्रेस, दत्तवाडमध्ये भाजप तर दानोळीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीवर आहे. पन्हाळा तालुक्यातील सातवे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आघाडीवर आहेत. कागल तालुक्यात सेनापती कापशी मतदारसंघातून शशिकला खोत तर बोरवडे मतदारसंघातून शोभाताई फराकते आघाडीवर आहेत.
करवीर तालुक्यात टपाली व ईव्हीएम मतमोजणी सुरू असून उजगाव मतदारसंघात भाजपचे नामदेव वाइंगडे 301 मतांनी आघाडीवर आहेत. कसबा सांगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा रणजीत कांबळे, तर शिये मतदारसंघात काँग्रेसचे विश्वनाथ पाटील आघाडीवर आहेत. दानोळी मतदारसंघात नंदिनी संदीप कांबळे आघाडीवर असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर जि.प. निवडणूक : घुणकीत काँग्रेस विजयी, इतर ठिकाणी आघाडीचे चित्र स्पष्ट
|