बातम्या
तपोवन प्रीमियर लीगचा भव्य समारोप : बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
By nisha patil - 4/12/2025 8:24:10 PM
Share This News:
तपोवन प्रीमियर लीगचा भव्य समारोप : बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
कोल्हापूर : तपोवन ग्राउंड येथे तपोवन क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तपोवन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. लीगच्या रोमांचक अंतिम सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षिसांचे वितरण भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव व अभय तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी आप्पा लाड, अनिल कामत, विजयसिंह खाडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच परिसरातील नागरिक व सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
तपोवन प्रीमियर लीगमुळे स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची एक उत्तम संधी मिळाली असून पुढील काळात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
तपोवन प्रीमियर लीगचा भव्य समारोप : बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
|