विशेष बातम्या
"तारा न्यूज"चा सहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न;
By nisha patil - 5/26/2025 4:57:10 PM
Share This News:
"तारा न्यूज"चा सहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न;
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला वर्धापनदिन सोहळा...
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य करणाऱ्या "तारा न्यूज" चा सहावा वर्धापन दिन नुकताच उत्साहात आणि थाटात पार पडला. या विशेष सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि "तारा न्यूज"च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी खासदार निवेदिता माने या उपस्थित होत्या. यावेळी तारा न्यूज" च्या एमडी कल्पिता कुंभार यांनी त्यांचे स्वागत केले. माझी खासदार व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या निवेदिता माने यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.
यावेळी हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर, आणि नेते अर्जुन आबिटकर, ठाकरे गटाचे नेते प्रकाश पाटील, राजू यादव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या प्रतिकात्मक कृतीमुळे कार्यक्रमाला एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक पैलू लाभला.
कार्यक्रमास राजकीय तसेच माध्यम क्षेत्रातील विविध मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी "तारा न्यूज"च्या सामाजिक जाणिवा जपणाऱ्या पत्रकारितेचे कौतुक करत संस्थेच्या भावी यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
"तारा न्यूज"चा सहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न;
|