बातम्या
ताराराणी आघाडीचा प्रभाग क्रमांक 7 मधील भव्य प्रचार दौरा संपन्न
By nisha patil - 11/28/2025 3:41:55 PM
Share This News:
ताराराणी आघाडीचा प्रभाग क्रमांक 7 मधील भव्य प्रचार दौरा संपन्न
ढोल–ताशांच्या गजरात उमेदवारांचे जोरदार स्वागत
आजरा नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीने प्रभाग क्रमांक सातमध्ये अतिशय उत्साहात आणि भव्यतेने प्रचार रॅलीचे आयोजन केले. या प्रचार दौऱ्यात ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी आणि प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. बालिका सचिन कांबळे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आपली विकासाभिमुख भूमिका मांडली.
🔶 ढोल–ताशांच्या नादात प्रभागात प्रचाराचा जल्लोष
रॅलीची सुरुवात प्रभाग क्रमांक सातमधील हरिजन वाडा, दत्त कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी या भागातून करण्यात आली.
ढोल, हलगी, सिटी आणि घोषणांच्या गजरात रॅलीत मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
संपूर्ण परिसरात “ताराराणी आघाडी विजयी व्हा – शिट्टी चिन्ह दाबा” या घोषणांनी वातावरण दणानून गेले.
महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करून समर्थन दर्शविले.
🔷 विकासासाठी ठोस आश्वासने – उमेदवारांचा नागरिकांशी संवाद
रॅलीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांना प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, नळजल पुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक प्रकाशयोजना, क्रीडांगणे, महिला सुरक्षितता यासंदर्भातील आगामी योजनांची माहिती दिली.
तसेच प्रभागासाठी दीर्घकालीन आणि स्थिर विकास देण्याचा दृढनिश्चय उमेदवारांनी व्यक्त केला.
ताराराणी आघाडीचे चिन्ह – शिट्टी, नागरिकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवण्यात आले.दिवसभर लहान मुले तोंडात शिटी धरून वाजवत फिरत असल्यामुळे एक वेगळीच वातावरण निर्मिती झाली आहे.
🔶 प्रमुख मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांची भक्कम उपस्थिती
या भव्य प्रचार रॅलीला मान्यवर आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली:
नाम.प्रकाश आबिटकर यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र भोसले, शरीफभाई खेडेकर आय. के. पाटील सर, विलास नाईक, विजयकुमार पाटील,डॉ. दीपक सातोसकर, किशोरआण्णा भुसारी, वासू केसरकर,बसवराज महाळंक, संजय शिंत्रे, खोत सर विलास कांबळे, दिनकर कांबळे, मनोहर कांबळे, सुरेश कांबळे राजू कांबळे, तानाजी कांबळे, दीपक कांबळे, अभिजीत शिंदे नितीन यादव, अक्षय माळी, विशाल कांबळे, विनोद कांबळे आकाश कांबळे, मयूर कांबळे, श्रीधर कांबळे, अरुण कांबळे जया कांबळे, वैशाली कांबळे, स्वप्ना कांबळे, विश्रांती कांबळे आरती कांबळे, अंजना कांबळे, पवित्र कांबळे कुणाल कांबळे, भाऊ कांबळे, प्रकाश कांबळे, अश्विन कांबळे नितीन कांबळे, दिलीप कांबळे, शिवाजी कांबळे, अभिजीत कांबळे अजित कांबळे, रागिनी कांबळे, सविता कांबळे, सरिता कांबळे रेखा कांबळे, गीता पोतदार मॅडम नेहा पेडणेकर, राजश्री पाटील, शैलजा पाटील, आसिफ खेडेकर, मुस्तकीम मुल्ला, सद्दाम खेडेकर, आसिम लम्तुरे, शोएब भडगावकर, कैफ खेडेकर, सोहेल इंचनाळकर, शाहिद खेडेकर, वसीम खेडेकर, सोहेल लतीफ़, जैद इंचनाळकर, अरबाज़ इंचनाळकर, कुदरत हिंग्लजकर, अजीम पटेल, मुबारक खेडेकर, समीर खेडेकर, अकिब तगारे, महम्मद गौस तगारे, सरफराज तगारे, अशफाक तगारे, अरमान लमतुरे, विशाल नायक, गणेश नाइक, तबरेज शिराज, नदीम कांडगांवकर, मुस्तकीम खेडेकर, अयूब खेडेकर, अमन खेडेकर या सर्वांच्या सहभागामुळे प्रभाग सातमधील रॅली अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साहवर्धक ठरली. उद्या सकाळचे प्रचार नियोजन – प्रभाग क्रमांक 2
ताराराणी आघाडीच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. पूजा अश्विन डोंगरे यांच्या प्रचारासाठी उद्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये खालील ठिकाणी घराघर संपर्क मोहीम राबवली जाणार आहे: शिवाजीनगर जिजामाता कॉलनी नबापूर परिसर स्थानिक नागरिकांना भेटून विकासकामांची माहिती देत समर्थन मिळविण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे होणार आहे.
ताराराणी आघाडीचा प्रभाग क्रमांक 7 मधील भव्य प्रचार दौरा संपन्न
|