राजकीय

ताराराणी आघाडीचा प्रचाराचा धडाका

Tararani aghadi


By nisha patil - 11/25/2025 10:41:40 PM
Share This News:



ताराराणी आघाडीचा प्रचाराचा धडाका

आजरा(हसन तकीलदार)-आजरा नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडी तर्फे प्रभाग क्रमांक 9 व 10 मध्ये जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात आली.

 

प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार सिकंदर इस्माईल दरवाजकर, प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार सौ. यास्मिन कुदरत लतीफ तसेच ताराराणी आघाडीचे प्रमुख आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांच्या समर्थनार्थ आज वाडा गल्ली, दर्गा गल्ली व मेन रोड परिसरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

 

रॅलीदरम्यान घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत विकासकामांची माहिती देण्यावर उमेदवारांकडून विशेष भर देण्यात आला. या प्रचार रॅलीमध्ये विलासराव नाईक, डॉ. अनिल देशपांडे, डॉ.दीपक सातोसकर, वसीम दरवाजकर, शोएब दरवाजकर, मोहम्मद दरवाजकर, भरत कांबळे, बाळू कुंभार, मजिद दरवाजकर, दाऊद दरवाजकर, कादिर दरवाजकर, नौशाद चांद, जहिद जमाल, अय्याज माणगावकर, उजेर दरवाजकर, रेहान दरवाजकर, रसूल आगा, शोकात चांद, शरीफ खेडेकर,गणी खेडेकर, अब्दुल रहीम खेडेकर, नईम मुराद, सिद्दिक माणगावकर, असिफ दरवाजकर, दानिश लतीफ, इमाम नेसरीकर, आरिफ मालदार, रिजवान फकीर, इरफान मुल्ला, इजाज माणगावकर, असिफ मुल्ला, मतीन मुराद, हुरेर माणगावकर, जैद माणगावकर, जब्बार तकिलदार, हुसेन पटेल मोठ्या संख्येने कार्यकर्त्यासह तरुण वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

प्रचार मोहीमेदरम्यान उमेदवारांसोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणि परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगतदार झाले.

 

 

🔴 *उद्या सकाळचे नियोजन*

 

उद्याची सकाळी ठीक 8 वाजता प्रभाग क्रमांक 5 व 6 मधील मदरसा कॉलनी, मुल्ला कॉलनी, एकता कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी मध्ये घर-टू-घर प्रचार राबविण्यात येणार असून कार्यकर्त्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे.


ताराराणी आघाडीचा प्रचाराचा धडाका
Total Views: 162