राजकीय

ताराराणी आघाडीची प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

Tararani aghadi prachar


By nisha patil - 11/28/2025 10:52:59 PM
Share This News:



*ताराराणी आघाडीची प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 

**आजरा(हसन तकीलदार)*:- आगामी आजरा नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीकडून प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचाराची जोरदार सुरुवात झाली. प्रभागातील विद्यानगर, भारतनगर आणि बळीराम देसाई कॉलनी परिसरात ढोल-ताशे व हलगीच्या गजरात भव्य घर-घर प्रचार रॅली काढण्यात आली.

या रॅलीत प्रभाग एकच्या नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. अश्विनी संजय चव्हाण तसेच नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अशोक अण्णा चराटी यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन विकासाच्या आश्वासनांसह आपली दृष्टी मांडली.

आघाडीचे निवडणूक चिन्ह शिट्टी… शीट्टीच्या जोरदार उत्साहात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात रॅली उत्साहात पार पडली. नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

रॅलीला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. नामदार माननीय प्रकाशराव आबिटकर यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र भोसले यांच्यासह शिवाजी गुडुळकर, आर. टी. जाधव सर, आय. के. गिलबिले सर, जयवंत पाटील, बाळासाहेब पांडव, अमर जाधव, याकूब बागवान, बारिश घोळ, श्रीधर चव्हाण, श्रीधर कळेकर, आनंदा चव्हाण, गुलाब बागवान, इलाई बागवान, पुंडलिक कोल्हे, पांडू कोल्हे, अरुण नाईक, अनिल नाईक, किरण नाईक, तानाजी नाईक, महादेव पोवार, संजय नाईक, दशरथ अमृते, विजयकुमार पाटील, निवृत्ती शेंडे, विलास नाईक, सतीश कुरुणकर, संजय कुरुंणकर, दिग्विजय घाडगे, समीर जाधव, प्रताप जाधव, गिरीश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, पुरुषोत्तम पटेल, आशिष पटेल, नितीन पारपोलकर, सुरेश गड्डी, खोत सर, सोनू सडेकर, शिवा देवर, इर्शाद बुड्ढेखान, समीर मकानदार, अमर केंबळे, रहीम लतीफ, रौफ नसरदी, पापा लतीफ, राजेंद्र चौगुले, आसिफ काक्तीकर, इब्राहम, शिवराज सुतार, इम्रान बुडडेनार, मुबारक काकतीकर, नसरुद्दीन मुल्ला, मुख्तार काक्तिकर, अब्दुल माणगावकर, मकसूद माणगावकर, हर्षद इंचनाळकर, सलीम ढालाईत, रफिक आजगेकर, अंकुश चव्हाण, शकील बेडसुरे, रफिक बेडसुरे, खुदबुद्दीन तगारे, सलीम नाईकवाडे, यासीन सैय्यद( सर), कैफ शेख, जुबेर मुल्ला, असिफ मुराद, रशिद लाडजी, मुबारक नसरदी, बशीर शेख, मकसूद काकतीकर, विनोद जाधव, नारायण चव्हाण, संतोष भाटले, सुधाकर वंजारे, चंद्रकांत जाधव, अभिजीत येलकर, शरीफभाई खेडेकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताराराणी आघाडीचा जोमदार प्रचार, उमेदवारांचा आत्मविश्वास आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.


ताराराणी आघाडीची प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
Total Views: 404