राजकीय

तावरे कुटूंबीयांचा शिवसेनेत प्रवेश..

Taware family members join Shiv Sena


By nisha patil - 1/20/2026 3:16:57 PM
Share This News:



कापशी जिल्हा परिषदेच्या 2012च्या निवडणूकी मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा पराभव करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्योगजक परशुराम तावरे यांच्या सुविद्य पत्नी सौ अश्विनी परशुराम तावरे यांनी शिवसेना पक्षात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रवेश केला.

 

सन 2012च्या जिल्हा परिषद निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत नवीद हसन मुश्रीफ यांचा पराभव करून कागल व कोल्हापूर च्या राजकारणात खळबळ उडवून देणारे तावरे कुटूंबीयांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे कागलच्या राजकारणात माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या गटाला बळ मिळाले आहे..


 पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सोबत, माजी आमदार व गोकुळ संचालक सुजित मिणचेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलगुडे , शिवसेना कागल तालुका प्रमुख  सुधीर पाटोळे , नंदकुमार सूर्यवंशी
उपस्थित होते.


तावरे कुटूंबीयांचा शिवसेनेत प्रवेश..
Total Views: 40