बातम्या
"अधिकार्यांच्या अन्यायाविरोधात शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने टळली दुर्घटना!"
By nisha patil - 10/27/2025 4:36:31 PM
Share This News:
"अधिकार्यांच्या अन्यायाविरोधात शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने टळली दुर्घटना!"
बेनिक्रे (ता. कागल) येथील शिक्षक शंकर पांडुरंग रामशे (वय 50) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर ज्वालाग्रही पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
शेताची संरक्षक भिंत व नारळाची झाडे जेसीबीने पाडल्यामुळे संतप्त झालेल्या रामशे यांनी पूर्वीच आत्मदहनाचा इशारा दिला होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
"अधिकार्यांच्या अन्यायाविरोधात शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने टळली दुर्घटना!"
|