शैक्षणिक

व्यंकटराव शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

Teachers Day celebrate


By nisha patil - 6/9/2025 11:35:00 AM
Share This News:



व्यंकटराव शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात संपन्न.


आजरा-(हसन तकीलदार) - : येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व आपल्या आजरा तालुक्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, देशातील तीन शिक्षण तज्ञापैकी एक महान शिक्षण तज्ज्ञ डॉ. जे. पी.नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य  एम. एम.नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे. शेलार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
    यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपले विचार मांडले व सर्व शिक्षकांना नमन करून पुष्प भेट दिले.

प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर यांनी डॉ. जे.पी.नाईक यांचे भारताच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. गुरुचे प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा असे म्हटले जाते. आई ही प्रथम गुरू त्यानंतर आपल्या जीवनात क्षणाक्षणाला दिशा, मार्गदर्शन देत आकार देणारे हे वयाने लहान असणारे देखील गुरुस्थानी पोहोचतात. त्यामुळे प्रत्येकाजवळ नम्रता, आदर, संयम असणे आवश्यक आहे .

व्यंकटराव शिक्षण संकुलातील अध्यक्ष  जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ हे आम्हा शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना मार्गदर्शन , आधार देणारे हे नेहमीच  आमच्या सर्वांच्या गुरुस्थानी आहेत असे यावेळी सांगितले.
   कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी क वर्गशिक्षक व विद्यार्थ्यांनी केले सूत्रसंचालन पी.व्ही. पाटील यांनी व आभार डी.आर पाटील यांनी मानले.


व्यंकटराव शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात संपन्न
Total Views: 50