बातम्या

*आजऱ्यात टीम सतेजने जपला महाविकास आघाडीचा धर्म

Team Satej upheld the religion of Mahavikas Aghadi during this time


By nisha patil - 11/21/2026 2:52:39 PM
Share This News:



*आजऱ्यात टीम सतेजने जपला महाविकास आघाडीचा धर्म

*मुकुंद देसाई यांच्या वाढदिनी रुग्णांना वाटले फळे व बिस्कीट

*आजरा(हसन तकीलदार):-मुकुंद देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत टीम सतेजने आजऱ्यात महाविकास आघाडीचा धर्म पाळला. टीम सतेज आपल्या कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. आजरा तालुक्यातील सहकाराची जाण असलेले, विरोधकांनासुद्धा जवळ करणारे, निःस्वार्थ, संयमी, शांत आणि निष्ठावंत व्यक्तिमत्व असणारे, जनता बँक व आजरा साखर कारखान्याचे चेअरमन यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. हार तुरे, गुच्छ यांना फाटा देत वह्या पेन स्विकारित मुकुंद देसाई यांचा वाढदिवस साजरा केला गेला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष म्हणून धुरा संभाळीत तालुक्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवून राष्ट्रवादी जिवंत ठेवणारे मुकुंद देसाई यांच्या वाढदिवसादिनी महाविकास आघाडीची निष्ठावंत फळी म्हणून परिचित असलेली टीम सतेज जे बंटी पाटील यांचे समर्थक आहेत;एकत्र येत त्यांनी आजरा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करीत महाविकास आघाडीच्या धर्माचे पालन करीत सामाजिक बांधिलकी जपली.
   

वाढदिवसाचा आनंद केवळ शुभेच्छापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक उपक्रमाशी सांगड घालीत समाजातील गरजू आणि रुग्णासोबत रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करून त्यांना लवकर बरे होण्याची सदिच्छा व्यक्त केली.ही खरोखरच अनुकरणीय आणि आदर्शवत बाब आहे.
       

यावेळी रवींद्र भाटले, राजू होलम, नौशाद बुड्डेखान, निसार लाडजी, किरण कांबळे, आरिफ खेडेकर, सुफियान खेडेकर, रवी तळेवाडीकर, सुमित सावंत, विक्रम देसाई, श्रीकृष्ण कोगेकर, अमोल गावडे, सोहेल पठाण यांच्यासह महाविकास आघाडी व टीम सतेजचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*आजऱ्यात टीम सतेजने जपला महाविकास आघाडीचा धर्म
Total Views: 74