ताज्या बातम्या
टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड; दिल्ली–मुंबई एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग, मोठा अनर्थ टळला
By nisha patil - 12/22/2025 1:26:54 PM
Share This News:
दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला टेकऑफनंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. विमानाच्या इंजिनमध्ये ऑइल प्रेशरशी संबंधित तांत्रिक समस्या आढळून आल्यानंतर वैमानिकांनी सतर्कता दाखवत तातडीने आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला.
संबंधित विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर परत उतरवण्यात आले असून विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.
घटनेनंतर प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले असून विमानाची सखोल तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
टेकऑफनंतर तांत्रिक बिघाड; दिल्ली–मुंबई एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग, मोठा अनर्थ टळला
|