बातम्या

विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे “Techno Spark” उत्साहात संपन्न

Techno Spark concluded with enthusiasm


By Administrator - 12/3/2026 1:46:18 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे “Techno Spark” उत्साहात संपन्न

 विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील B.Sc Computer Science (Entire) विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त Techno Spark या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धेत वैष्णवी कुंभार, मधुरा भुयार आणि श्रुती खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सिद्धी जाधव आणि साक्षी कामटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. सई पाटील यांनी तर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. अमर सावंत यांनी काम पाहिले.

हा कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. पल्लवी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. आर . आर.माने यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नादिया पटेल यांनी केले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्जनशीलता यामुळे हा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरला.


विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे “Techno Spark” उत्साहात संपन्न
Total Views: 11