बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त 'तेजोमय तेजोनिधी' नृत्याविष्कार कोल्हापुरात

Tejomay Tejonidhi dance performance on the occasion of Maharashtra Day in Kolhapur


By nisha patil - 4/29/2025 5:14:52 PM
Share This News:



महाराष्ट्र दिनानिमित्त 'तेजोमय तेजोनिधी' नृत्याविष्कार कोल्हापुरात

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनतर्फे ‘तेजोमय तेजोनिधी’ या विशेष भरतनाट्यम नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांवर आधारित हा कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे.

सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृतिका सौ. धनश्री आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम 'नृत्यश्री' मिरज, 'कलांगण' मुंबई व 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती' यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. सौ. आपटे यांच्या शिष्यांकडून सावरकरांच्या प्रचलित व अप्रचलीत गीतांवर नृत्यसादरीकरण होणार असून, या अप्रचलीत गीतांना स्वरबद्ध केले आहे गायिका सौ. वर्षा भावे यांनी. सावरकर विचारांचे प्रखर चित्रण अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांच्या निवेदनातून होणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आलेली नाही. तमाम सावरकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


महाराष्ट्र दिनानिमित्त 'तेजोमय तेजोनिधी' नृत्याविष्कार कोल्हापुरात
Total Views: 113