सीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर

Temporary relocation of some departments at CPR Hospital


By nisha patil - 11/3/2026 4:13:08 PM
Share This News:



सीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर

कोल्हापूर :-  छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर करून तेथील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

बाह्यरुग्ण विभागातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (खोली क्र. २०३) हा विभाग त्वचा व गुप्त रोगशास्त्र विभागात (खोली क्र. ३०६) १३ मार्चपासून स्थलांतरित करण्यात येणार असून तेथूनच रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू ठेवली जाणार आहे. तसेच त्वचा व गुप्त रोगशास्त्र विभागाचा बाह्यरुग्ण विभाग हा विभागप्रमुखांच्या कक्षात व शेजारच्या खोलीत सुरू ठेवण्यात येईल.

सर्व रुग्णांनी तसेच संदर्भित करणाऱ्या रुग्णालयांच्या प्रमुखांनी या बदलाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून रुग्णांची गैरसोय टाळता येईल व भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देता येईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.
 


सीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर
Total Views: 24