बातम्या
सीमा प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक; बेळगाव जिल्ह्यात जाण्याचा निर्धार
By nisha patil - 2/11/2026 2:59:28 PM
Share This News:
सीमा प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक; बेळगाव जिल्ह्यात जाण्याचा निर्धार
कोल्हापूर प्रतिनिधी :- अजित बोडके महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आक्रमक झाला आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्यात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आगामी काळात बेळगाव दौऱ्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, युवासेना जिल्हा प्रमुख अवधुत पाटील, शांताताई जाधव, राजू रेडेकर, तालुका प्रमुख विष्णू गावडे, युवराज पवार, अजित खोत, जयसिंग टिकले, नवनाथ पाटील, महेश पाटील, सुहास गुरव, यल्लाप्पा मुतकेकर, सुशील दळवी, किरण नागुर्डेकर, शिवाजी पाटील, शिवाजी तरवाळ, विशाल चव्हाण, संजय पाटील, सुमित कोरवी, दिगंबर पाटील, मदन शिंदे, दगडू कांबळे, सुरेश हेब्बाळे, राजू किटवाडकर, बाबू चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले की, "बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. त्याच भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमाभागातील मराठी माणसावर अन्याय होत असेल तर ठाकरे गट गप्प बसणार नाही. गरज पडल्यास आम्ही सर्वजण बेळगावात जाऊन मराठी बांधवांना पाठिंबा देऊ."
सीमा भागातील मराठी शाळा, मराठी पाट्या आणि मराठी भाषिकांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सीमा प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक; बेळगाव जिल्ह्यात जाण्याचा निर्धार
|