राजकीय

पन्हाळ्यातील तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय...

That banner in Panhala is becoming a topic of discussion


By nisha patil - 11/27/2025 4:18:28 PM
Share This News:



पन्हाळ्यातील गडावरील सुशिक्षित समाजसेवक राज होळकर यांनी आपल्या घराच्या गेटवर एक फलक लावला आहे, जो सध्या फक्त पन्हाळ्यातच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

या फलकावर लिहिलेले संदेश नेते, उमेदवार आणि मतदार यांच्यासाठी अंजनासारखे थेट डोळ्यात घालणारे ठरले आहेत. बॅनरवर त्यांनी स्पष्ट शब्दांत मत दिले आहे की, मतदान हा फक्त हक्क नाही, तर आपल्या विवेकाचा आणि जबाबदारीचा विषय आहे; मनी पावर, दबाव आणि फसवे मतदान यांना नकार द्या. मतदान करा मनाने आणि अंतःकरणाने.

इतकेच नव्हे, तर श्री. राज होळकर यांनी समाज माध्यमांवर देखील आपल्या मतदारांना आणि नागरिकांना जागरूक करण्याचे संदेश दिले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे निवडणुकीविषयक चर्चेत नवीन वळण आले आहे, आणि लोकशाहीच्या खऱ्या मूल्यांकडे लक्ष वेधले गेले आहे.

आज पन्हाळ्याच्या गल्लीबोळ्यांपासून कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, राज होळकरांचा हा बॅनर आणि संदेश चर्चेचा विषय बनला आहे,


पन्हाळ्यातील तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय...
Total Views: 8