विशेष बातम्या

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 107 वी जयंती उत्साहात साजरी होणार

The 107th birth anniversary of education guru


By nisha patil - 7/6/2025 3:23:46 PM
Share This News:



शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 107 वी जयंती उत्साहात साजरी होणार

कोल्हापूर | 9 जून 2025: शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10.30 वाजता आयोजित मुख्य समारंभास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री मा. प्रकाशराव आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे असतील.

दुपारी 2 ते 4.30 दरम्यान गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी शैक्षणिक चर्चासत्र होणार आहे.
डॉ. साळुंखे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची गंगा महाराष्ट्र व कर्नाटकात पोहोचवली. आज संस्थेच्या 406 शाखांतून 10 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

बापूजींच्या कार्यामुळे संस्था एक सुसंस्कृत परिवार बनला असून, त्यांचे स्मरण प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 107 वी जयंती उत्साहात साजरी होणार
Total Views: 149