बातम्या
राज्य कबड्डी स्पर्धेतील विजेत्या १२ खेळाडूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ₹१०,००० चं बक्षीस!
By nisha patil - 5/19/2025 4:02:06 PM
Share This News:
राज्य कबड्डी स्पर्धेतील विजेत्या १२ खेळाडूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ₹१०,००० चं बक्षीस!
ठाणे येथे पार पडलेल्या ७२व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत विजेते ठरलेल्या कोल्हापूर संघातील १२ खेळाडूंचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी प्रत्येकी ₹१०,००० रोख बक्षीस देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
“ऑलिंपिक गाठण्याचं स्वप्न ठेवा आणि सातत्याने सराव करा,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूरला दर्जेदार कबड्डी मैदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं.
राज्य कबड्डी स्पर्धेतील विजेत्या १२ खेळाडूंना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ₹१०,००० चं बक्षीस!
|