बातम्या

*कोल्हापूर येथे आखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्याचे 24 वे अधिवेशन होणार

The 24th session of the All India Kisan Sabha


By nisha patil - 5/10/2026 4:28:26 PM
Share This News:



*कोल्हापूर येथे आखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्याचे 24 वे अधिवेशन होणार

*दि. 6,7 व 8 ऑक्टोबरला शाहू महाराज जन्मस्थळी सभेचे नियोजन
 

*आजरा(हसन तकीलदार):-अखिल भारतीय किसान सभा,महाराष्ट्र राज्याचे 24 वे राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ दि.6, 7 व 8 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती कॉ. संग्राम सावंत यांनी दिली 

यावेळी सांगण्यात आले की,कोल्हापूर विभागातील  आजरा- चंदगड -गडहिंग्लज -भुदरगड या तालुक्यातील सभासद व इतर शेतकरी यांनी मंगळवार दि. 6 ऑक्टोबर, 2026 रोजी  सकाळी 10.30  राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ कसबा बावडा,कोल्हापूर येथून  पहिल्या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेमध्ये सर्वानी सहभागी होयचे आहे.त्यानुसार याची तयारी सर्वांनी करायची आहे
       

महाराष्ट्रातील व आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत त्या ठिकाणी मांडणी करून याच्या सोडवणुकीचे मार्ग शोधता येणार आहेत. पुढील लढ्याचा कार्यक्रम ठरणार आहे. भागातून शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोचवता येईल.असे सांगण्यात आले.
           

किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे तसेच राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख व राज्य सेक्रेटरी डॉ. अजित नवले या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.देशासह, राज्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा याठिकाणी होणार आहे.
              यावेळी कॉम्रेड संग्राम सावंत,ॲड.दशरथ दळवी, कॉ. शिवाजी गुरव,संदीप भोगण,भगवान सुर्यवंशी,संभाजी मोहिते, शिवाजी गिलबिले,सुप्रिया पाटील,गायत्री रणदिवे,संजय कांबळे, समीर खेडेकर, सचिन लोहार,अनिल सुतार,संतोष माने,भारती पवार, लक्ष्मी कांबळे, मजीद मुल्ला,अक्षय कांबळे,जयश्री कांबळे, सारिका देवेकर, अश्विनी कांबळे,पूजा पाटील, विनोद देवेकर, उत्तम कांबळे, युवराज पाटील, शशिकला देशमुख,सुरेखा पाथरवट, बाबासाहेब कांबळे, राजेंद्र देशमुख, रामा कांबळे, केरबा बागडी व इतर सर्व सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


*कोल्हापूर येथे आखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्याचे 24 वे अधिवेशन होणार
Total Views: 74