बातम्या

पतसंस्थेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

The 48th Annual General Meeting of the credit union


By nisha patil - 9/22/2025 3:05:26 PM
Share This News:



पतसंस्थेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

 कोल्हापूर दि : 22 : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेची सन 2024-25 ची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 21.09.2025 रोजी दुपारी 1.00 वाजता संस्थेच्या प्रांगणातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये खेळीमेळीत पार पडली.कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली.  उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे यांनी केले.

सभेच्या प्रारंभी संस्थेच्या अहवाल सालात जे थोर नेते, शास्त्रज्ञ, संशोधक, संस्थेचे सभासद दिवंगत झाले  अशा सर्व ज्ञात, अज्ञात व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली.संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सी.ई.ओ  कौस्तुभ गावडे  यांच्या हस्ते संस्थेतील प्राथमिक शिष्यवृत्ती, क्रीडा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, डिप्लोमा, डीग्री, पी.जी. मधील गुणवता प्राप्त् सभासद पाल्यांचा तसेच सन 2024-25 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पतसंस्था सभासदांचा सत्कार करणेत आला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे सी.ई.ओ  कौस्तुभ गावडे यांनी मार्गदर्शन केले. 

प्रास्ताविक व अहवाल वाचन पतसंस्थेचे चेअरमन  हितेंद्र साळुंखे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी सन 2024-25 मध्ये पतसंस्थेला एकूण निव्वळ नफा रु. 2 कोटी 57 लाख झाला असल्याची माहिती दिली.सभेच्या सुरवातीला मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसीडींग व सन 2024-25 सालचा अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रके वाचून कायम करण्यात आली. या सभेमध्ये सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच सभासदांना 10.25% लाभांश जाहीर करण्यात आला. सभेचे नोटीस वाचन पतसंस्थेचे सेक्रेटरी संपत वेटाळे यांनी केले.

सभेचे आभार पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दिपक जाधव यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप पाटील यांनी केले. या सभेसाठी पतसंस्थेचे लेखा परीक्षक  के. एम. देशपांडेसो, संस्थेचे सर्व संचालक, बहुसंख्य सभासद, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

 
    

------------------------------------------------------------------------------------------------------------------


पतसंस्थेची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
Total Views: 64