खेळ
51 वी कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू!
By nisha patil - 9/10/2025 5:08:29 PM
Share This News:
51 वी कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू!
कोल्हापूर :शहीद अशोक कामटे क्रीडांगण येथे 51 वी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू झाली. उद्घाटन मा. अमोल येडगे, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले.
या वेळी मा. योगेश कुमार, पोलीस अधीक्षक, धीरज कुमार, तानाजी सावंत, प्रिया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील 175 खेळाडू सहभागी झाले असून, विविध सांघिक व वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनाचा मान राष्ट्रीय खेळाडू अमृत तिवले यांनी ज्योत संचलन करून मिळवला.उद्घाटन सामन्यात पोलीस मुख्यालय संघाने करवीर उपविभागावर 2-0 ने विजय मिळवला.
जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना या स्पर्धा पाहण्याचे आवाहन केले आहे.
51 वी कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा उत्साहात सुरू!
|