बातम्या

The 63rd Annual General Meeting...दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स लि., इचलकरंजीची ६३ वी वार्षिक सभा उत्साहात पार

The 63rd Annual General Meeting


By nisha patil - 5/7/2025 8:17:15 PM
Share This News:



दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स लि., इचलकरंजीची ६३ वी वार्षिक सभा उत्साहात पार

प्रकाशआण्णा, स्वप्निलदादा व वैशालीताई आवाडे यांची प्रमुख उपस्थिती

इचलकरंजी, दि. ५ जुलै २०२५ : दि यशवंत को-ऑपरेटिव्ह प्रोसेसर्स लि., इचलकरंजी संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे, व संस्थेचे संचालक आदित्य आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे चेअरमन अहमद मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

सभेला व्हा. चेअरमन राजाराम बोंगार्डे, संचालक मुकुंद पोवार, श्रेणिक मगदूम, चंद्रकांत घाटगे, रमेश कबाडे, अरुण निंबाळकर, आनंदा दोपारे, रवी जावळे, मोहन काळे, रणजितसिंह गायकवाड, राजेश भिसे, सुहास कांबळे, सौ. जेवरबानू दुंडगे, तसेच संस्थेचे मॅनेजर शफीक मणेर आणि अनेक मान्यवर, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेच्या प्रगतीचा आढावा, नवीन योजना व आर्थिक स्थिती यावर सविस्तर चर्चा झाली. सभेचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आले.
 


The 63rd Annual General Meeting ...दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स लि., इचलकरंजीची ६३ वी वार्षिक सभा उत्साहात पार
Total Views: 133