बातम्या

‘गोकुळ’ ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीत संपन्न..

The 63rd Annual General Meeting of Gokul


By nisha patil - 9/9/2025 11:36:01 PM
Share This News:



‘गोकुळ’ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली

कोल्हापूर, दि. ९ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, कागल येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली.

यावेळी आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अहवाल सादर करताना संघाने केलेली उलाढाल, शेतकऱ्यांना मिळालेले उच्चांकी दर, सामाजिक बांधिलकी, तसेच भविष्यातील योजना सभासदांसमोर मांडण्यात आल्या.

🔹 आर्थिक प्रगती :

  • एकूण उलाढाल : ₹३,९६६ कोटी (₹२९६ कोटी वाढ)

  • भाग भांडवल : ₹७७.९८ कोटी

  • ठेवी : ₹५१२ कोटी (गतवर्षी ₹२४८ कोटी)

  • राखीव निधी : ₹५०२.२७ कोटी

🔹 दूध संकलन :

  • एकूण संकलन : ५८.२० कोटी लिटर

  • म्हैस दूध : २७.०८ कोटी लिटर

  • गाय दूध : ३१.१२ कोटी लिटर

  • एक दिवसातील कमाल संकलन : १८.५९ लाख लिटर

  • वार्षिक वाढ : ८.४२%

🔹 दूध दर :

  • म्हैस दूध : सरासरी ₹६०.४८ / लिटर

  • गाय दूध : सरासरी ₹३६.८४ / लिटर

  • दरफरक : म्हैस ₹२.४५, गाय ₹१.४५ / लिटर

  • उत्पादकांना दिवाळीपूर्वी ₹१३६ कोटींचे वितरण

🔹 महत्वाचे निर्णय :

  • संचालक मंडळ सदस्यसंख्या २१ वरून २५ करण्यास मंजुरी

  • वासरू दूध दर : म्हैस ₹१२, गाय ₹८ / लिटर

  • मुंबई व पुणे येथे जागा खरेदीस मंजुरी

  • प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बटर व पेढा प्रोजेक्टसाठी कर्ज मंजूर

🔹 भविष्यातील योजना :

  • आईस्क्रिम, चीज, दही, बासुंदी उत्पादन

  • नवी मुंबई व पुण्यात मदर डेअरी प्रकल्प

  • सी.एन.जी. पंप व ई-चार्जिंग स्टेशन

  • रेडया संगोपन केंद्र व उच्च वंशावळीची जनावरे

  • ‘आयडीयल टीएमआर’ मिश्रित चारा उत्पादन

  • नवीन २ एचपी चाफकटर निर्मिती

सभेच्या उद्घाटनावेळी माननीय मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के.पी. पाटील यांच्यासह गोकुळचे वरिष्ठ पदाधिकारी, संचालक, संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘गोकुळ’ ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण व खेळीमेळीत संपन्न..
Total Views: 154