ताज्या बातम्या
कापूसखेड गावचे सुपुत्र हरी भक्त पारायणकार एस. के. पाटील (अण्णा) यांचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात
By nisha patil - 12/1/2026 12:00:42 PM
Share This News:
हरी भक्त पारायणकार *एस. के. पाटील (अण्णा)* यांचा *७५ वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा* मोठ्या उत्साहात हॉटेल भाग्यश्री ताकारी येथे संपन्न झाला. या सोहळ्यास *माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. शिवाजीराव नाईक साहेब* प्रमुख उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना शिवाजीराव नाईक साहेब म्हणाले की, “अण्णा दरवर्षी पायी दिंडीने पंढरपूर वारी करतात. कोणतेही सार्वजनिक अथवा वैयक्तिक कार्य असो—अडचणीचे असो किंवा चांगले—ते नेहमी सकारात्मक भावना व चिकाटीने काम करतात. प्रत्येक प्रसंगी अण्णा कणखरपणे उभे राहतात.”
त्यांनी अण्णांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली.
यावेळी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कराड, श्री अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अध्यक्ष वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री. केदार पाटील,उपसभापती शिराळा कृषी उत्पन्न बाजार समिती श्री विजय महाडिक,राजेंद्र माने कुंडलिक देसाई, संतोष महाराज,नितीन कीर्दत, हौसेराव भोसले, सुभाष भोसले,अभिजीत पाटील,सागर पाटील,डी. के. पाटील (तात्या),संपत पाटील, सौ. वैशाली पाटील,सौ. कांचन पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक पंडित पाटील सर यांनी केले. कार्यक्रम शांततामय व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला
कापूसखेड गावचे सुपुत्र हरी भक्त पारायणकार एस. के. पाटील (अण्णा) यांचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात
|