ताज्या बातम्या
व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
By nisha patil - 1/26/2026 1:21:02 PM
Share This News:
व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
आजरा(हसन तकीलदार):-. येथील व्यंकटराव शिक्षण संकुलात 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा पटेकर यांचे शुभहस्ते झाले यावेळी सचिव अभिषेक शिंपी, सचिन शिंपी, पांडुरंग जाधव,सुधीर जाधव, प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, सीनियर कॉलेज प्रभारी प्राचार्य पन्हाळकर सर, प्राथमिक मुख्याध्यापक आर. व्ही. देसाई, एनसीसी ऑफिसर महेश पाटील,प्रशालेतील विविध कमिटीतील प्रमुख,मान्यवर दाते, पालक,व्यंकटराव संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
एनसीसी विभागमार्फत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे संचलन लक्षवेधी ठरले.
यावेळी शाळेतील इयत्ता दहावीतील आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रणव पाटील, सिमरन पाटील, साहिल दीपक पाटील, आर्या जाधव यांची व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवणारे विद्यार्थी आस्था सचिन गुरव, हाजीक इरफान मोहम्मद सय्यद व मार्गदर्शक शिक्षिका सौ. ए.एस.गुरव यांना उपस्थित मान्यवरांच्या व दात्यांच्या हस्ते पारितोषिक , शिल्ड व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी मुस्तफिज खेडेकर याने आपले विचार मांडले. त्यानंतर सीनियर कॉलेजचे क्रीडा शिक्षक पी.आर. तेरसे यांनी विद्यार्थिनींकडून मल्लखांबाचे प्रात्यक्षिक करून सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
|