बातम्या

आजऱ्यात मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती उत्साहात साजरी

The 85th birth anniversary


By nisha patil - 1/9/2025 4:07:43 PM
Share This News:



आजऱ्यात मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती जल्लोषात साजरी

आजरा : संवेदना फाउंडेशनच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती आजरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व्यंकटराव हायस्कूलपासून मृत्युंजय स्मृतिदालनापर्यंत भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली. त्यानंतर “मृत्युंजयकारांचा वारसा – विचारांचा खजिना” या विषयावर परिसंवाद झाला.

प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे तर अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे उपस्थित होते. कलात्मक सादरीकरणे, एकपात्री प्रयोग, कादंबरी अभिवाचन यामुळे कार्यक्रम रंगला. “झोका कथा स्पर्धा” व “गड्या आपला गाव बरा” निबंधमाला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शेवटी साहित्यिक मेळाव्यात विविध साहित्यिकांनी कविता व कथा सादर केल्या. या सोहळ्याद्वारे शिवाजीराव सावंत यांच्या साहित्य, विचारसंपदेचा वारसा व प्रेरणा उजाळली गेली.


आजऱ्यात मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती उत्साहात साजरी
Total Views: 57