बातम्या
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ८७ वी सभा खेळीमेळीत संपन्न
By nisha patil - 9/9/2025 11:32:35 AM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ८७ वी सभा खेळीमेळीत संपन्न
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जावर व्याजदर कपात
कोल्हापूर-: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८७ वी वार्षिक सभा महासैनिक दरबार सभागृहात आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जावरील व्याजदर १२ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा ठराव सभेत मांडण्यात आला.
या सभेला बँकेचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, ज्येष्ठ संचालिका निवेदिता माने, सर्व संचालक, पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्यासह मान्यवरांनीही चर्चेत सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ८७ वी सभा खेळीमेळीत संपन्न
|