ताज्या बातम्या
शाहू विचारांच्या प्रसारासाठी झटणाऱ्या शाहू छत्रपती फौंडेशनच्या पाठीशी छत्रपती परिवार श्रीमंत मालोजीराजे छत्रपतींची ग्वाही
By nisha patil - 12/26/2025 11:17:39 AM
Share This News:
गेली चौदा वर्षे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार शाहू छत्रपती फौंडेशन तळमळीने करत आहे. या संस्थेच्या पाठीशी कोल्हापूरचा छत्रपती परिवार नेहमीच राहील, अशी ग्वाही श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांनी आज येथे बोलताना दिली.
राजर्षी शाहू महाराजांच्या पद स्पर्शाने पुणीत झालेल्या नवीन राजवाडा परिसरात शाहू छत्रपती फौंडेशनच्या राजर्षी या दिन दर्शीकेचे प्रकाशन मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करणारी राजर्षी ही जगातील एकमेव दिनदर्शिका आहे. 2026 सालच्या या दिन दर्शीकेचे प्रकाशन आज झाले.
यावेळी बोलताना शाहू छत्रपती फौंडेशनचे संस्थापक सचिव जावेद मुल्ला, आणि संचालक पत्रकार नवाब शेख यांनी संस्थेच्या गेल्या चौदा वर्षातील कार्याचा आढावा घेतला. संस्थेच्या भविष्यातील ' शाहू शिधा या उपक्रमा सह विविध कार्यासाठी कोल्हापूरचा छत्रपती परिवार कायम पाठीशी राहील, अशी ग्वाही श्रीमंत मालोजीराजे छत्रपतीनी यावेळी बोलताना दिली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक जयेशभाई ओसवाल, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते - उद्योजक सिकंदरभाई देसाई, अभिजित केंबळे, अष्का देसाई, उम्मेहाणी पटेल, अहमद पटेल, युवराज कांबळे, आहद मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते.
शाहू विचारांच्या प्रसारासाठी झटणाऱ्या शाहू छत्रपती फौंडेशनच्या पाठीशी छत्रपती परिवार श्रीमंत मालोजीराजे छत्रपतींची ग्वाही
|