बातम्या

गवारेड्याच्या धडकेत जखमी कर्मचाऱ्यांना वनविभागाने तातडीने मदत करावी -हरिभाऊ कांबळे

The Forest Department should immediately provide


By nisha patil - 5/2/2026 4:33:14 PM
Share This News:



गवारेड्याच्या धडकेत जखमी कर्मचाऱ्यांना वनविभागाने तातडीने मदत करावी -हरिभाऊ कांबळे
 

आजरा(हसन तकीलदार):- ता.आजरा,गवसे येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून रात्रीची 8/4 ची शिफ्ट संपवून पहाटे आजऱ्याकडे येत असताना मसोली जवळ रस्त्यावर अचानक गवा रेडा आडवा येऊन काशिम लतीफ व विजय येजरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही खाली पडून जखमी झाले. पाठीमागून येणाऱ्या कारखाना कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान साधत तातडीने रुग्णवाहीका बोलवून त्यांना उपचारासाठी हलवले.

यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही वनविभागाने तातडीने मदत करणे गरजेचे होते. परंतु याबाबत कोणत्याही हालचाली दिसून न आल्याने जय शिवराय किसान संघटनेचे तालुका अध्यक्ष व साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ कांबळे हे प्रत्यक्ष अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना घेऊन वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे.
     

सदर निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावर गवा रेड्याने धडक दिल्याने काशिम लतीफ व त्यांचे स्टाफ मेम्बर विजय येजरे यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्याचप्रमाणे दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. लतीफ यांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली असल्याने शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आणि हे दोघेही कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. लतीफ यांना अंथरुणावर पडून रहावे लागणार असल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे या प्रकरणाची आपलेकडून योग्य ती सत्वर दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

*जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीच्या रणधुमाळीतही हरिभाऊ सारखा संचालक स्वतः वनविभाग व त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चाललेली धडपड ही खरोखरच अनुकरणीय आणि आदर्श बाब आहे. हा माणूस खिशाने फाटका असला तरी मनानं लई श्रीमंत आहे अशी भावना काहीजण व्यक्त करतात
 यावेळी हरिभाऊ कांबळे, रहिमभाई लतीफ, भिवा येजरे आदिजण उपस्थित होते.


गवारेड्याच्या धडकेत जखमी कर्मचाऱ्यांना वनविभागाने तातडीने मदत करावी -हरिभाऊ कांबळे
Total Views: 400