राजकीय
माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांचे गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!
By nisha patil - 7/29/2026 1:51:15 PM
Share This News:
माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांचे गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिले होते. त्याची मुदत दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून देखील शासनाने अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली नाही.
शासन जाणीवपूर्वक गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात होते त्यामुळे पुंगाव तालुका राधानगरी येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्था यांनी माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी झाली असून त्या कामी न्यायमूर्ती मिलिंद जाधव व न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांचे खंडपीठाने सदर याचिकेची दखल घेऊन मा. सर्वोच्च न्यायालय यांचे गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश असताना देखील शासनाने कच्ची मतदार यादी देखील अद्याप प्रसिद्ध न केल्याने नाराजी व्यक्त केली व शासनास व दुग्ध विभागास गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
सदर निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू न केल्यास मा. सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशाचा अवमान केल्याबद्दल संबंधितांवर कायद्यातील तरतुदी अन्वये योग्य ती कारवाई केली जाईल असे आदेश दिले. सदर संस्थेचे वतीने ज्येष्ठविधीज्ञ श्रीनिवास पटवर्धन व एडवोकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली.
माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांचे गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!
|