ताज्या बातम्या
ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जयंत्युत्सवाचा आरंभ
By nisha patil - 1/22/2026 6:17:46 PM
Share This News:
ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जयंत्युत्सवाचा आरंभ
को.दि. २३ : प्रतिवर्षी प्रमाणे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जयंत्युत्सवाचा प्रारंभ कपिलतीर्थ येथील पादुका मंदिरात आज झाला. शुक्रवार दि.३० जानेवारी २०२६ पर्यंत होणाऱ्या या उत्सवात भक्तांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबुराव ठाणेकर यांनी केले आहे.
1920 साली कपिलतीर्थ येथील ठाणेकरांच्या वास्तूत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून प्रतिवर्षी महाराजांची पुण्यतिथी, गुरुपौर्णीमा आणि जयंत्युत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमी ते माघ शुद्ध द्वादशी असा जयंत्युत्सव चालतो.
या वर्षी या उत्सवामध्ये रोज सायंकाळी ६.३० वाजता ह.भ.प.श्री. गजानन बुवा वठारकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. शुक्रवार दि.३० जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता जन्माख्यानाचे कीर्तन होणार असून ९ वाजता जन्मकाळ होणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२.३० नंतर महाप्रसाद होणार आहे. सर्व सांप्रदायिक मंडळीनी या उत्सवात सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणेकर कुटुंबियानी केले आहे.
ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जयंत्युत्सवाचा आरंभ
|