बातम्या

कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आजरा पोलीस ठाणे गणेशोत्सव सन 2026 पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

The Kolhapur District Police Force and Ajara Police


By nisha patil - 7/10/2026 6:32:50 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आजरा पोलीस ठाणे गणेशोत्सव सन 2026 पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
 

*धामणेच्या फ्रेंडशिप मंडळाने मारली बाजी

*आजरा(हसन तकीलदार):-दरवर्षी दिला जाणारा गणराया अवॉर्ड स्पर्धेचे निकाल जाहीर करून आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात गणराया अवॉर्डचे वितरण अगदी उत्साहात पार पडले.
   

स्वागत व प्रास्ताविक वामन सामंत यांनी केले. तर उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रस्ताविकात वामन सामंत म्हणाले की, गणेशोत्सव पाठोपाठ नवरात्रोत्सव सण डॉल्बीमुक्त होतोय हे खरोखरच अभिनंदनीय आहे. आजरा पोलीस यंत्रणेने सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावले. तहसील विभागाने आपत्ती व्यवस्थापन सांभाळले, महावीतरणने वीज खंडित होऊ दिले नाही. नगरपंचायतीने स्वच्छता आणि आरोग्य विभागाने आरोग्य शिबीरे घेतली. सर्वांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व गणेश मंडळानीही डॉल्बीमुक्त आणि शांततेने गणेशोत्सव साजरा केला.
      या गणराया अवॉर्ड स्पर्धेत धामणेच्या फ्रेंडशिप मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकवला तर शिवसेना प्रणित जयशिवराय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, लिंगायत गल्ली मंडळाने तिसरा आणि अवधूत तरुण मंडळ उत्तूरला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश शेटे, महावीतरणचे कनिष्ठ अभियंता कृष्णा कोळी व पाटबंधारे विभागचे अभियंता उपस्थित होते.
 

एक गाव एक गणपती स्पर्धेत नवक्रांती सरोळी प्रथम, हनुमान मंडळ झुलपेवाडी द्वितीय, राजा शिवाजी मलिग्रे तृतीय तर न्यू जयशिवराय विटे उत्तेजनार्थ ठरले. यावेळी क्रेन मालक व डॉल्बीमुक्त बाबत 63 गावांचाही सत्कार करण्यात आला.
   

गंगामाई वाचन मंदिरचे अध्यक्ष वामन सामंत, आरोग्य सेवक युनूस सैय्यद, अमित गुरव आणि ऍड. सचिन इंजल यांनी परीक्षक म्हणून अगदी उत्तमरित्या जबाबदारी पार पडल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
   

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे म्हणाले की, यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी शांततापूर्वक सण साजरा केला आहे. त्याचपद्धतीने नवरात्रउत्सव डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्याचा वापर करून शांततेत साजरा करावा. सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये. प्रशासनाने दिलेल्या वेळेत मिरवणूक पूर्ण करावी, स्वयंसेवक ठेवावे शक्यतो सिसिटीव्ही कॅमेरे बसवा. विधायक व सामाजिक उपक्रम राबवून सहकार्य करावे असे आवाहन केले.
   नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई म्हणाले की, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करावा असे आवाहन केले.
   

यावेळी वर्षा बागडी, अर्चना होलम, माधुरी पाचवडेकर, नगरसेवक अनिकेत चराटी, महाविरणचे संतोष डोंगरे, नगरपंचायतचे प्रदीप नाईक, अबूसईद माणगावकर, शरीफ खेडेकर, महेश पाटील, आनंदा फडके, इस्माईल सोनेखान यांच्यासह सर्व मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आजरा पोलीस ठाणे गणेशोत्सव सन 2026 पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
Total Views: 23