बातम्या

पदवीधर-शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महायुती मैदानात! कराडमध्ये कौस्तुभ गावडेंचा मतदारांशी संवाद!

The Mahayuti steps up to address


By nisha patil - 10/13/2026 3:01:39 PM
Share This News:



पदवीधर-शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महायुती मैदानात! कराडमध्ये कौस्तुभ गावडेंचा मतदारांशी संवाद!

पुणे पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे आयोजित मतदार संवाद बैठकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे सहभागी झाले. या बैठकीच्या माध्यमातून पदवीधर, शिक्षक आणि युवकांच्या अपेक्षा जाणून घेत निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक नियोजन अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी युवकांना शिक्षण, करिअर आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षक, पदवीधर आणि युवकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न समजून घेण्याबरोबरच महायुतीची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.


पदवीधर-शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महायुती मैदानात! कराडमध्ये कौस्तुभ गावडेंचा मतदारांशी संवाद!
Total Views: 10