बातम्या

आजरा नगरपंचायत निवडणुकीत अखेर ताराराणीची शिट्टी घुमली

The Queen whistle finally blew


By nisha patil - 12/21/2025 6:08:39 PM
Share This News:



आजरा नगरपंचायत निवडणुकीत अखेर ताराराणीची शिट्टी घुमली
 

आजरा(हसन तकीलदार )*:-विरोधकांच्या फुटीचा अशोक चराटी यांना फायदा मिळत शेवटी नगराध्यक्षपदासह 8 जागा जिंकल्या.काॅंग्रेसचा फाजील आत्मविश्वास नडला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..आघाडीत राहून निवडणूक लढवली असती तर आणखीन जागा मिळाल्या असत्या मात्र हात चिन्हाचा अट्टाहास आणि महाविकास आघाडीतील शिलेदारांच्यावर झालेला अन्याय यामुळे मागे जावे लागले.अन्याय निवारण आघाडीच्या केवळ दोन जागा आल्या.शरद पवार राष्ट्रवादीची तुतारी वाजली.ऐनवेळी राष्ट्रावादीचे तालुक्याचे नेते मुकुंददादा देसाई यांनी आरिफ खेडेकर यांच्या मातोश्री रहिमतबी खेडेकर यांची राष्ट्रवादीसाठी अधिकृत उमेदवारी असलेचे केलेले आवाहन पथ्यावर पडले. तारा न्यूजने त्यांची मुलाखात प्रसिद्ध केली होती.याचा फायदा खेडेकर यांना झाला त्यामुळे खेडेकर यांनी तारा न्यूजचे आभार मानले.
 

अशोक चराटी यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला.सुरुवातीला यांच्या विरोधात सर्व पक्ष, गट एकवटले मात्र नंतर या आघाडीने चिन्हासाठी आणि आपल्या मर्जीतील प्रतिनिधीसाठी सवतासुभा मांडला.हात चिन्हावर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता. मुस्लिम समाजातील मते मिळतील या आशेने लढले.मात्र काॅंग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या मंजूर मुजावर यांनी बंड करित अपक्ष निवडणूक लढवली.मुजावर यांच्यामुळे काॅंग्रेसला मोठा फटका सहन करावा लागला.मंजूर मुजावर यांनी सर्वांना झुंजविले.अपक्ष असताना आणि पाठबळ नसतानासुद्धा दोन नंबरची मिळवली.त्यामुळे आता मुस्लिम मतांचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. सेक्युलर पक्ष कायम मुस्लिम मतांचा वापर करून घेतात परंतु उमेदवारी देताना त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. याची चीड घेऊनच मंजूर मुजावर हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरले होते. याचा फायदा अशोआण्णा चराटी यांना झाला. आणि अशोकअण्णांची शिटी घुमली. मंजूर मुजावर यांच्या उमेदवारी मुळे सर्वात जास्त काँग्रेसला फटका बसणार होता हे सर्वांना माहित होते. शेवटपर्यंत त्यांची मानधरणी करण्याचा प्रयत्न झाला परंतु कोणत्याही वरिष्ठ नेत्याला न जुमानता त्यांनी अपक्ष उमेदवारीचा आट्टाहास केला.अखेर त्याचा फटका काँग्रेसला बसला.महाविकास आघाडीच्या नेत्यांची उदासीनता आणि आजऱ्यातील ठराविक काँग्रेसीना दिलेले अधिकार यामुळे नगराध्यक्ष पद गमवावे लागले असे राजकीय तज्ञाचे मत आहे. बंडखोऱीमुळे काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले.प्रभाग क्र. 9 मधून काँग्रेसच्या उमेदवार रेश्मा नौशाद बुडडेखान यांनी सर्वात जास्त मताधिक्य घेत विजय मिळवला.
पराभव झालेले प्रमुख उमेदवार - आजरा कारखाना संचालक रशीद पठाण,कारखाना संचालक व माजी नगरसेवक संभाजी पाटील, माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर, माजी नगरसेवक सिकंदर दरवाजकर, स्वीकृत माजी नगरसेवक आनंदा कुंभार, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा भैरवी सावंत 

  नगराध्यक्ष पदासाठी पडलेली मते

◾ अशोक चराटी.      4224

◾ मंजूर मुजावर        3496

◾संजय सावंत.         2477

◾ डॉ.श्रध्दानंद ठाकूर 1050

◾बाकीयू खेडेकर         112

◾नियामत मुजावर.         37

नगरसेवक पदासाठी पडलेली मते

प्रभाग 1

अश्विनी चव्हाण (ताराराणी आघाडी) - 323 (विजयी)

अनसा माणगावकर (अपक्ष) : 02

भैरवी राजेंद्र सावंत (काँग्रेस) :133

प्रभाग 2

संजय इंगळे (अन्याय निवारण समिती) : 121

पूजा डोंगरे (ताराराणी आघाडी) : 481

संभाजी पाटील (शिवसेना ठाकरे गट) : 230

प्रभाग 3

रहिमतबी खेडेकर ( शरद पवार गट) :409 (विजयी)

समीना खेडेकर (ताराराणी आघाडी) :  191 

सुमैय्या खेडेकर (काँग्रेस) :124

प्रभाग 4

मुसासरफराज पटेल (काँग्रेस) :200 (विजयी)

जावेद पठाण (अन्याय निवारण समिती) :52

रशीद पठाण (ताराराणी आघाडी) : 178

नदीम मुल्ला (अपक्ष) :53

प्रभाग 5

नाझिया खेडेकर (राष्ट्रवादी शरद पवार गट) :  65

निशात चाँद (ताराराणी आघाडी) : 194 (विजयी)

जास्मिन सय्यद (काँग्रेस) : 94

प्रभाग 6

अन्वी केसरकर (ताराराणी आघाडी) : 142 (विजयी)

शाहीन तकीलदार (अपक्ष) :103

साधना मुरुकटे (काँग्रेस) : 113

प्रभाग 7

कलाबाई कांबळे (काँग्रेस) : 407 (विजयी)

गीता कांबळे (अपक्ष) :  13

बालिका कांबळे (ताराराणी आघाडी) :237

प्रभाग 8

सुहेल काकतीकर (अपक्ष) : 238

इकबाल शेख (ताराराणी आघाडी) : 410

असिफ सोनेखान (काँग्रेस) : 490 (विजयी)

प्रभाग 9

रेश्मा बुड्डेखान (काँग्रेस) : 841 (विजयी)

यास्मिन लतीफ (ताराराणी आघाडी) : 188

प्रभाग 10

आनंदा कुंभार (अपक्ष) : 191

लहू कोरवी (अपक्ष) : 07

सिंकदर दरवाजकर (ताराराणी आघाडी) : 297

निसार  लाडजी (काँग्रेस) : 356 (विजयी)

प्रभाग 11

डॉ. स्मिता कुंभार (अन्याय निवारण समिती) - 233 (विजयी)

गीता सावंत (ताराराणी आघाडी) : 221

आरती  हरणे (काँग्रेस) : 97

प्रभाग 12

समीर  गुंजाटी (काँग्रेस) :  336

अनिकेत चराटी (ताराराणी आघाडी) : 404 (विजयी)

समीर तकीलदार (अपक्ष) :05

गौरव देशपांडे : (अन्याय निवारण समिती) : 85

दिलशाद पटेल (अपक्ष) :114

प्रभाग 13

रवींद्र पारपोलकर (अन्याय निवारण समिती) : 343 

परेश पोतदार (ताराराणी आघाडी) :444 (विजयी)

प्रभाग 14

सिद्धेश नाईक (ताराराणी आघाडी) : 161

सूर्यकांत नार्वेकर (अपक्ष) : 44

अभिषेक शिंपी (काँग्रेस) :174 (विजयी)

प्रभाग 15

परशराम बामणे (अन्याय निवारण समिती) : 377 (विजयी)

शैलेश सावंत (ताराराणी आघाडी) : 251

प्रभाग 16

अश्विनी विजय कांबळे (अपक्ष) : 30

रेश्मा खलीफ (अपक्ष) :53

आसावरी खेडेकर (ताराराणी आघाडी) : 183 (विजयी)

संगीता चंदनवाले (अपक्ष) : 120

बानू तळगुळे (अपक्ष) :111

श्रुती पाटील (अन्याय निवारण समिती) :49

मीनाक्षी संतोष पुजारी (शिवसेना ठाकरे गट) :118

प्रभाग 17

सरिता गावडे ( राष्ट्रवादी शरद पवार गट) :  257

स्नेहल निकम (अपक्ष) :08

आरती मनगुतकर (अन्याय निवारण समिती) :29

पूनम  लिचम (ताराराणी आघाडी) : 309 (विजयी)

(आकडेवारीत कदाचित थोडा बदल होऊ शकतो)


आजरा नगरपंचायत निवडणुकीत अखेर ताराराणीची शिट्टी घुमली
Total Views: 1176