बातम्या

कागल येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला! 

The Shri Swami Samarth Prakat Din ceremony


By Administrator - 3/23/2026 2:53:31 PM
Share This News:



कागल येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला! 

कागल  स्वप्निल गोरंबेकर : कागल येथील चिंतामणी पार्क येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराकडून दिनांक २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये स्वामींचे काकड आरती पार पडली.

सकाळी नऊ ते दहा श्री स्वामी समर्थ यागाचे आयोजन करण्यात आले होते तर स्वामींची मध्यान आरती ही दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये स्वामींची सांगता आरती आणि महाप्रसाद ही सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत च्या वेळेमध्ये करण्यात आले या सोहळ्याची सांगता स्थानिक हरिपाठ भजनी मंडळाच्या माध्यमातून हरिपाठ भजनाने झाली.
 

दरम्यानच्या कार्यक्रमास कागल नगर परिषदेचे  नगरसेवक  प्रवीण काळबर , नगरसेवक अर्जुन नाईक , नगरसेवक उमेश सावंत माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी , मीडियातून  महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाचे सचिव व दै. रोखठोक चे पत्रकार राजेंद्र ढाले , एस न्यूज चे उपसंपादक प्रशांत दळवी तसेच दै. सम्राट चे संपादक अमर सणगर यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. तर संध्याकाळची सांगता आरती कागल नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्या हस्ते पार पडली. या सगळ्या कार्यक्रमाच्या रूपरेषेने चिंतामणी पार्क स्वामींच्या नामघोशामध्ये पुरता बुडून गेल्याचे दिसून आले.


कागल येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला! 
Total Views: 21