कृषी

दालमिया साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर न करता कारखाना सुरू ठेवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखान्यास जाणारी ऊस वाहतूक रोखली.

The Swabhimani Shetkari Sanghatana blocked the sugarcane transport


By nisha patil - 8/11/2025 10:45:45 AM
Share This News:



जयसिंगपूर:-
       दत्त साखर कारखान्याने चालू वर्षी तुटणा-या ऊसाला ३५०० रूपये पहिली उचल जाहीर केली असून यामधील ३४०० रूपये ऊस तुटल्यापासून १४ दिवसात व उर्वरीत १०० रुपये फेब्रवारी महिन्यात अदा करण्याबाबत निर्णय होवून यावर्षीच्या पहिल्या उचलीबाबत तोडगा निघाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
          गेल्या १५ दिवसापासून ऊसदराबाबत सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाने साखर कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. मध्ये मोडतोड करून पहिली उचल जाहीर केले आहेत. दरम्यान कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र झाल्याने कारखाने पुर्णत: बंद ठेवण्यात आले आहेत. 
          काल दत्त साखर कारखाना शिरोळ यांनी  ३५०० रूपये जाहीर करून उसदराची कोंडी फोडण्यात आली आहे. यामधील ३४०० रूपये ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात व हंगाम संपल्यानंतर १०० रूपये देण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कालपासून दत्त साखर कारखान्याने कारखाना कार्यक्षेत्रात उसतोडी देण्यास सुरवात केली आहे. 
     याबाबत स्वाभिमानीकडून या निर्णयाबाबत ३५०० रूपयाची उचल मान्य करून जे कारखाने ३४०० रुपयापेक्षा कमी एफ. आर. पी देणारे आहेत त्यांनी ३५०० रूपये पहिली उचल देण्यात यावी व ३५०० रूपयापेक्षा जादा एफ. आर. पी. असणा-या कारखान्यांची एफ. आर. पी अधिक १०० रूपये दर देवून कारखाने चालू करावे असा सन्मानजनक तोडगा काढावे अशी मागणी केली आहे. जर याप्रमाणे तोडगा ज्या कारखान्यांना मान्य नसेल त्या कारखान्यांचा गाळप बंद पाडण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले आहे.


दालमिया साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर न करता कारखाना सुरू ठेवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कारखान्यास जाणारी ऊस वाहतूक रोखली.
Total Views: 45