बातम्या
भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न
By nisha patil - 8/15/2025 2:44:40 PM
Share This News:
भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर महानगरतर्फे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नामदार चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या पदयात्रेत भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी विशेष आकर्षण निर्माण केले. बिनखांबी गणेश मंदिर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिरंगा हाती घेऊन पदयात्रेला सुरुवात केली. महाद्वार रोड परिसर, पापाची टिकटी मार्गे पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विसर्जित करण्यात आली. भारतीय सैन्याची दिमाखदार कामगिरी दाखवणारा ऑपरेशन सिंधूरचा फलक विशेष लक्षवेधी ठरला.
यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "देशाच्या फाळणीदरम्यान असंख्य हिंदू नागरिकांची हत्या, माता-भगिनींची विटंबना झाली. या घटना लक्षात ठेवून अखंड व समर्थ भारत घडवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक व ऑपरेशन सिंधूरद्वारे भारताने जगासमोर आपल्या सामर्थ्याची प्रचीती दिली आहे. जर तिकडून एक गोळी निघाली, तर इकडून तोफांचा भडीमार होईल हे आपण प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे."
या पदयात्रेत महेश जाधव, विजय जाधव, विराज चिखलीकर, अमर साठे, राजू मोरे, अमोल पालोजी, सुनील पाटील, विनय खोपडे, धनश्री तोडकर, विशाल शिराळकर, अप्पा लाड, रवी गवळी, भरत काळे, सयाजी अळवेकर, दीपक काटकर, आजम जमदार, राजश्री शेलके, किरण नकाते, गिरीश साळोख, अजित सूर्यवंशी, प्रकाश सरनाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न
|