बातम्या
युनेस्को संदर्भातील बैठक पन्हाळ्यातच घ्यावी" – नागरिकांचा ठाम निर्धार
By nisha patil - 4/23/2025 2:03:25 PM
Share This News:
युनेस्को संदर्भातील बैठक पन्हाळ्यातच घ्यावी" – नागरिकांचा ठाम निर्धार
पन्हाळावासीयांचा जिल्हाधिकारी बैठकीवर बहिष्कार"
युनेस्को जागतिक वारसा यादीसंदर्भातील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीसाठी पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेने नागरिकांना फक्त एका दिवसाच्या नोटीसीद्वारे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मात्र या प्रक्रियेला नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवून, बैठकीस हजर न राहण्याचा एकमुखी ठराव केला आहे.
दि. २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारनंतर नागरिकांना नोटीस पाठवण्यात आली की, २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. परंतु ही सूचना अचानक मिळाल्यामुळे पन्हाळ्यात तातडीने वाहतूक व्यवस्था करणे अशक्य होते, शिवाय नागरिकांना कोल्हापूरपर्यंतचा खर्चही परवडणारा नव्हता, असे नागरिकांनी स्पष्ट केले.
यासोबतच, महिला, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना उन्हाळ्यात प्रवास करणे कठीण होणार असल्यामुळे बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी असेही सुचवले की, ही बैठक पन्हाळ्यातच आयोजित करावी आणि शक्यतो सुट्टीच्या दिवशी घेण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित होईल. याशिवाय, किमान तीन दिवस आधी पूर्वसूचना दिल्यास तयारीची संधी मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
युनेस्को संदर्भातील बैठक पन्हाळ्यातच घ्यावी" – नागरिकांचा ठाम निर्धार
|