विशेष बातम्या

वारी परिवार मंगळवेढा यांचे शाश्वत प्रतिष्ठानतर्फे स्वागत

The Wari family of Mangalvedha is welcomed by the Shashwat Pratishthan


By nisha patil - 10/25/2025 6:06:09 PM
Share This News:



वारी परिवार मंगळवेढा यांचे शाश्वत प्रतिष्ठानतर्फे स्वागत

कोल्हापुर : येथील शाश्वत प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने वारी परिवार सायकल क्लब मंगळवेढा यांच्या शेतकरी राजाच्या सन्मानार्थ आयोजित मंगळवेढा ते पन्हाळगड या सायकल मोहिमेचे दसरा चौक कोल्हापुर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा शुभांगी गावडे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे स्मृतिचिन्ह व झाडाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरेकर फौडेशनचे अध्यक्ष अश्कीन आजरेकर हे होते.यावेळी बोलताना सचिवा शुभांगी गावडे यांनी अशा मोहिमांमधून समाज प्रबोधनाच्या कार्याबरोबरच इतिहास आणि निसर्ग संवर्धनाचे कार्य साधले जाते,अशा स्तुत्य उपक्रमास नेहमीच आपला पाठिंबा राहील असे मत व्यक्त केले. यावेळी वारी परिवारचे प्रा विनायक कलुबर्मे यांनी परिवाराच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन शाश्वत प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गुरुदत्त म्हाडगूत, उपाध्यक्ष राहुल चौधरी, संचालक डॉ धीरज शिंदे, संतोष परब,सुमित जामसांडेकर,नरेश पांचाळ, माजी नगरसेवक राहुल चव्हाण,डॉ सुनिल भोसले, डॉ प्रदीप पाटील,प्रा मधुकर पाटील प्रतिष्ठानचे सदस्य आणि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.a


वारी परिवार मंगळवेढा यांचे शाश्वत प्रतिष्ठानतर्फे स्वागत
Total Views: 40