बातम्या

पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री सेवा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात आगमन

The arrival of Lord Ganesha of the Shri Seva Ganeshotsav Mandal


By nisha patil - 9/15/2026 3:45:18 PM
Share This News:



पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री सेवा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात आगमन
 

दत्तवाड प्रतिनिधी : आचिन हेरवाडेदत्तवाड येथील श्री सेवा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले. गणरायाच्या आगमन मिरवणुकीत परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशे व पारंपरिक वाद्यांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
 

गणरायाची आगमन मिरवणूक बस स्टँड रोड, सरकारी दवाखाना रोड, दसरा चौक, गांधी चौक, हायस्कूल रोड या मार्गावरून काढण्यात आली. त्यानंतर बसव मंडप येथे विधिवत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.
 

विशेष म्हणजे, मंडळाच्या वतीने काढण्यात आलेली मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. गणरायाच्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने दत्तवाड नगरी दुमदुमून गेली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच गल्लीतील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

 

दरम्यान, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मिरवणुकीच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे मिरवणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली.“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”*च्या जयघोषात गणरायाचे दत्तवाडमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.


पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री सेवा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात आगमन
Total Views: 49