बातम्या
हैदराबादहून आलेल्या भव्य करवीरच्या राजाचे आगमन...
By nisha patil - 8/16/2025 2:32:19 PM
Share This News:
हैदराबादहून आलेल्या भव्य करवीरच्या राजाचे आगमन...
अद्वितीय कलाकुसर पाहण्यासाठी नागरिकांना आवर्जून येण्याचे आवाहन
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळ, करवीरच्या राजाचे आगमन आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावर्षीच्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती थेट हैदराबाद येथून खास आणलेली आहे.
मूर्तीचे आगमन होताच कोल्हापूरवासीयांनी ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या वर्षावात आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषात स्वागत केले. संपूर्ण परिसर भक्तिरसात आणि आनंदाच्या उत्साहात न्हाऊन निघाला.
या हैदराबादी मूर्तीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिची अद्वितीय कलाकुसर, सूक्ष्म नक्षीकाम आणि भव्य देखावा. कोल्हापूरवासीयांना अशी भव्य मूर्ती पाहण्याची ही एक खास संधी असून मंडळाने सर्व नागरिकांना मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येण्याचे आवाहन केले आहे.
हैदराबादहून आलेल्या भव्य करवीरच्या राजाचे आगमन...
|