बातम्या

दारूच्या नशेत मातृत्वाची राख — मुलाकडून मायची निर्दयी हत्या!

The ashes of a drunken motherhood


By nisha patil - 10/15/2025 6:10:23 PM
Share This News:



दारूच्या नशेत मातृत्वाची राख — मुलाकडून मायची निर्दयी हत्या!

कोल्हापूर, दि. १५ (प्रतिनिधी) — साळुंखे पार्क परिसर आज पहाटे एक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने हादरला! दारूसाठी पैशांवरून झालेल्या वादात एक पुत्र राक्षसी हावेत उतरला — स्वतःच्या जन्मदात्रीची निर्दयपणे वरवंट्याने हत्या केली!

विजय निकम या तरुणाने आपल्या आई सावित्रीबाई निकम (वय ५३) यांना पैशासाठी धमकावत वाद घातला. परंतु आईने नकार दिला आणि त्याच रागातून विजयने डोक्यात वरवंट्याने वार करत तिचा जागीच अंत केला. या अमानुष कृत्यानंतर तो मृतदेहाशेजारी शांत बसलेला आढळला, जणू पापाची जाणीवही हरवली होती.

स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
या मातृहत्येच्या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं असून लोकांच्या तोंडून एकच उद्गार — "दारूने पुन्हा एक घर उद्ध्वस्त केलं!"


दारूच्या नशेत मातृत्वाची राख — मुलाकडून मायची निर्दयी हत्या!
Total Views: 48