बातम्या

खंडपीठामुळे वेळ, पैसा व श्रमांची बचत होणार” — विजय जाधव

The bench will save time money and labor


By nisha patil - 8/19/2025 6:47:28 PM
Share This News:



खंडपीठामुळे वेळ, पैसा व श्रमांची बचत होणार” — विजय जाधव

भाजपाच्या गतिमान प्रशासनामुळे कोल्हापुरात खंडपीठाचा मार्ग सुकर — जिल्हाध्यक्ष विजय जाधव

 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होऊन प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्याने सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, राजकीय पदाधिकारी व विविध संघटनांच्या ४२ वर्षांच्या लढ्याला यश आले आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपाच्या वतीने आई अंबाबाई देवीस अभिषेक करून सरन्यायाधीश भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सकारात्मक दृष्टीकोन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम भूमिकेमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. शेंडापार्क येथील जमीन खंडपीठासाठी हस्तांतरित होण्याच्या मार्गावर असून, त्यामुळे भविष्यात खंडपीठाचा मार्ग सुकर होणार आहे.

या निर्णयामुळे वकिलांना व पक्षकारांना वेळ, पैसा व श्रम यांची मोठी बचत होईल. त्याचबरोबर कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होऊन अर्थकारणात सकारात्मक बदल होईल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आई अंबाबाई मंदिरात अभिषेकानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.


खंडपीठामुळे वेळ, पैसा व श्रमांची बचत होणार” — विजय जाधव
Total Views: 88