बातम्या
कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघातील सव्वा लाख बांधकाम कामगारांचा लाभ हा माझ्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद – मंत्री हसन मुश्रीफ
By nisha patil - 6/15/2025 1:41:39 AM
Share This News:
कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघातील सव्वा लाख बांधकाम कामगारांचा लाभ हा माझ्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद – मंत्री हसन मुश्रीफ
कागल, : “कामगार मंत्री असताना कामगार कल्याण मंडळाची स्थापना करून सव्वा लाखाहून अधिक बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्याचे भाग्य परमेश्वराने मला दिले,” असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. कागल येथील बापूसाहेब महाराज चौकात बांधकाम कामगारांना संसारोपयोगी ४,२८९ भांडी संच वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप (भैया) माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, प्रविणसिंह पाटील, नवल बोते, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले:
-
कागल मतदारसंघात १.२५ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे.
-
आतापर्यंत ७५ हजार कामगारांना भांडी संच देण्यात आले आहेत.
-
जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कल्याणकारी योजना या मंडळामार्फत राबविल्या जात आहेत.
-
शिक्षण, आरोग्य, निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधा उपलब्ध असून, दोन लाखांपर्यंत मोफत उपचार, ५ हजार रुपयांपर्यंत औषधांचे लाभही योजनेतून मिळणार आहेत.
-
“घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाण” चिन्हांवर बटन दाबा आणि महायुतीला यश द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रकाश गाडेकर यांनी मंत्री मुश्रीफ यांचे कार्य कोणत्याही विरोधकांच्या क्षमतेच्या पलीकडचे असल्याचे सांगितले.
भैय्या माने म्हणाले, “सामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले, त्यामुळे ते जनतेच्या हृदयात कायम आहेत.”
विशाल घोडके यांनी बांधकाम कामगारांसाठीच्या निवृत्ती वेतन योजनेची माहिती दिली – वयाच्या ६० नंतर दरवर्षी ₹१२,००० निवृत्तीवेतन, तसेच निधनानंतर पत्नीला लाभ.
कार्यक्रमात संजय चितारी, प्रविण काळबर, चंद्रकांत गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.
अशोक वड्ड, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, आदींसह अनेक लाभार्थी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“ईडीचा ससेमीरा लावून पराभव घडवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण परमेश्वर आणि गोरगरीब जनता माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला कोणी काही करू शकत नाही,” अशा शब्दांत मंत्री मुश्रीफ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघातील सव्वा लाख बांधकाम कामगारांचा लाभ हा माझ्यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद – मंत्री हसन मुश्रीफ
|