विशेष बातम्या
सर्वसामान्यांच्या आशीर्वादाची शिदोरी आयुष्यभर पुरेल – हसन मुश्रीफ
By nisha patil - 5/26/2025 4:42:08 PM
Share This News:
सर्वसामान्यांच्या आशीर्वादाची शिदोरी आयुष्यभर पुरेल – हसन मुश्रीफ
सिद्धनेर्लीत श्री. सिद्धेश्वर दूध संस्थेचा ऐतिहासिक विजय; नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी भावनिक उद्गार व्यक्त करत त्यांनी सांगितले की, "सर्वसामान्यांच्या आशीर्वादाची शिदोरी आयुष्यभर पुरेल". त्यांनी बहिणींना १५०० रुपयांची सुरू केलेली योजना २१०० रुपयांवर नेण्याची घोषणा केली. महात्मा फुले आरोग्य योजनेतून आता कोल्हापूरमध्येच ऑपरेशन्स होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शक्तीपीठ महामार्ग कागल तालुक्यातून जाणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
श्री. सिद्धेश्वर दूध संस्थेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. मंत्री मुश्रीफ यांनी संस्थेने राज्यात अग्रेसर राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले. सरपंच दत्तात्रय पाटील यांनी मुश्रीफ यांच्या विकासकामांचे कौतुक केले.
सर्वसामान्यांच्या आशीर्वादाची शिदोरी आयुष्यभर पुरेल – हसन मुश्रीफ
|